बायबल · 1 करिंथकरांस · अध्याय 13

1 करिंथकरांस 13

प्रीतीचा मार्ग

या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा

करिंथकरांस पहिले पत्र हे प्रेषित पौलाने सुमारे इ.स. 53 ते 55 मध्ये ग्रीसमधील करिंथ नगरात त्याने स्थापन केलेल्या ख्रिस्ती समाजाला लिहिलेले पत्र आहे. विविध परंपरांतील अभ्यासक हे निश्चितपणे पौलाचे लेखन मानतात. फूट, नैतिक प्रश्न, विवाह, उपासना, प्रभूभोजन, आत्मिक दाने आणि मृतांचे पुनरुत्थान या विषयांवर हे पत्र बोलते. प्रीतीविषयीचा अध्याय 13 हा बायबलमधील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या उताऱ्यांपैकी एक आहे.

हा अध्याय थोडक्यात

पौल करिंथ येथील मंडळीला सांगतो की अन्य भाषा बोलणे, संदेश देणे, ज्ञान, विश्वास आणि मोठा त्यागसुद्धा प्रीतीशिवाय व्यर्थ आहे. तो प्रीतीचे वर्णन सहनशील व उपकारशील असे करतो; ती हेवा करीत नाही, गर्व करीत नाही, अशोभनीय वागत नाही, अपकारांची नोंद ठेवत नाही आणि कधीही अपयशी ठरत नाही. आता आपण आरशात अस्पष्ट पाहतो, पण विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही टिकतात आणि यांमध्ये प्रीती श्रेष्ठ आहे, असे तो म्हणतो; हा अध्याय अनेकदा विवाहप्रसंगी वाचला जातो.

मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.

World English Bible: If I speak with the languages of men and of angels, but don’t have love, I have become sounding brass or a clanging cymbal.

आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.

World English Bible: If I have the gift of prophecy, and know all mysteries and all knowledge, and if I have all faith, so as to remove mountains, but don’t have love, I am nothing.

आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.

World English Bible: If I give away all my goods to feed the poor, and if I give my body to be burned, but don’t have love, it profits me nothing.

प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही.

World English Bible: Love is patient and is kind. Love doesn’t envy. Love doesn’t brag, is not proud,

प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही.

World English Bible: doesn’t behave itself inappropriately, doesn’t seek its own way, is not provoked, takes no account of evil;

प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते.

World English Bible: doesn’t rejoice in unrighteousness, but rejoices with the truth;

प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.

World English Bible: bears all things, believes all things, hopes all things, and endures all things.

प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;

World English Bible: Love never fails. But where there are prophecies, they will be done away with. Where there are various languages, they will cease. Where there is knowledge, it will be done away with.

कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो.

World English Bible: For we know in part and we prophesy in part;

पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल.

World English Bible: but when that which is complete has come, then that which is partial will be done away with.

जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.

World English Bible: When I was a child, I spoke as a child, I felt as a child, I thought as a child. Now that I have become a man, I have put away childish things.

आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतःकळते, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन,

World English Bible: For now we see in a mirror, dimly, but then face to face. Now I know in part, but then I will know fully, even as I was also fully known.

सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.

World English Bible: But now faith, hope, and love remain—these three. The greatest of these is love.

1 करिंथकरांस वर प्रश्नमंजूषा

  1. 1 कुरिन्थियों 13:4 प्रेम का वर्णन कैसे शुरू करता है?

  2. पौलुस कहता है कि अभी हम किसमें धुँधला सा देखते हैं?

  3. 1 कुरिन्थियों 13:13 के अनुसार कौन सी तीन बातें स्थायी हैं?

तुमचा स्कोर: 0 / 3

Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.

प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .

Search by task, life event, format or tool name, in English, हिंदी or Hinglish.