बायबल · योहान · अध्याय 13

योहान 13

शिष्यांचे पाय धुणे

या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा

हा अध्याय थोडक्यात

वल्हांडणापूर्वीच्या भोजनाच्या वेळी येशू आपल्या शिष्यांचे पाय धुतो आणि त्यांना सांगतो की जसे त्याने केले तसे त्यांनीही एकमेकांचे पाय धुवावेत; काही मंडळ्या पवित्र गुरुवारी ही कृती पुन्हा करतात. त्यांच्यापैकी एक त्याला धरून देईल असे तो सांगतो, आणि यहूदा रात्री बाहेर निघून जातो. येशू एक नवी आज्ञा देतो, 'जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा', आणि म्हणतो की यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात, आणि पेत्राला सांगतो की तो तीन वेळा त्याला नाकारील.

आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.

World English Bible: Now before the feast of the Passover, Jesus, knowing that his time had come that he would depart from this world to the Father, having loved his own who were in the world, he loved them to the end.

शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.

World English Bible: During supper, the devil having already put into the heart of Judas Iscariot, Simon’s son, to betray him,

येशू जाणत होता की, पित्याने त्याच्या हातात सर्व दिले होते आणि तो देवाकडून आला होता व देवाकडे जात होता;

World English Bible: Jesus, knowing that the Father had given all things into his hands, and that he came from God and was going to God,

येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्यवस्त्रे एकीकडे ठेवली आणि एक कापड घेऊन आपल्या कमरेला बांधला.

World English Bible: arose from supper, and laid aside his outer garments. He took a towel and wrapped a towel around his waist.

त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.

World English Bible: Then he poured water into the basin, and began to wash the disciples’ feet and to wipe them with the towel that was wrapped around him.

मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?”

World English Bible: Then he came to Simon Peter. He said to him, “Lord, do you wash my feet?”

येशूने त्यास उत्तर दिले, “मी काय करतो ते तुला आता कळत नाही, पण ते तुला पुढे कळेल.”

World English Bible: Jesus answered him, “You don’t know what I am doing now, but you will understand later.”

पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”

World English Bible: Peter said to him, “You will never wash my feet!” Jesus answered him, “If I don’t wash you, you have no part with me.”

शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे केवळ पायच धुऊ नका, तर हात आणि डोकेही धुवा.”

World English Bible: Simon Peter said to him, “Lord, not my feet only, but also my hands and my head!”

येशूने त्यास म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्यास पायांशिवाय दुसरे काही धुवायची गरज नाही, तर तो सर्वांगी शुद्ध आहे; तुम्ही शुद्ध आहा, पण सगळे जण नाही.”

World English Bible: Jesus said to him, “Someone who has bathed only needs to have his feet washed, but is completely clean. You are clean, but not all of you.”

कारण आपणाला विश्वासघाताने शत्रूच्या हाती कोण धरून देणार आहे हे त्यास ठाऊक होते, म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळे जण शुद्ध नाही.”

World English Bible: For he knew him who would betray him; therefore he said, “You are not all clean.”

मग त्याने त्यांचे पाय धुतल्यावर आपली बाह्यवस्त्रे घालून व तो पुन्हा खाली बसल्यावर त्यांना म्हणाला, “मी तुम्हास काय केले ते तुम्हास समजले काय?

World English Bible: So when he had washed their feet, put his outer garment back on, and sat down again, he said to them, “Do you know what I have done to you?

तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.

World English Bible: You call me, ‘Teacher’ and ‘Lord.’ You say so correctly, for so I am.

मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत.

World English Bible: If I then, the Lord and the Teacher, have washed your feet, you also ought to wash one another’s feet.

कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे.

World English Bible: For I have given you an example, that you should also do as I have done to you.

मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही.

World English Bible: Most certainly I tell you, a servant is not greater than his lord, neither is one who is sent greater than he who sent him.

या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.

World English Bible: If you know these things, blessed are you if you do them.

मी तुमच्यातील सर्वांविषयी बोलत नाही. मी ज्यांना निवडले आहे त्यांना मी ओळखतो. तरी, ‘ज्याने माझी भाकर खाल्ली त्यानेच माझ्याविरुद्ध आपली टाच उचलली,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.

World English Bible: I don’t speak concerning all of you. I know whom I have chosen; but that the Scripture may be fulfilled, ‘He who eats bread with me has lifted up his heel against me.’

आतापासून हे होण्याच्या आधीच मी हे तुम्हास सांगून ठेवतो, यासाठी की जेव्हा हे होईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.

World English Bible: From now on, I tell you before it happens, that when it happens, you may believe that I am he.

मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्यास स्वीकारतो.”

World English Bible: Most certainly I tell you, he who receives whomever I send, receives me; and he who receives me, receives him who sent me.”

असे बोलल्यावर येशू आत्म्यात अस्वस्थ झाला आणि साक्ष देऊन म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुमच्यांतला एकजण मला विश्वासघात करून शत्रूच्या हाती धरून देईल.”

World English Bible: When Jesus had said this, he was troubled in spirit, and testified, “Most certainly I tell you that one of you will betray me.”

तो कोणाविषयी बोलतो या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.

World English Bible: The disciples looked at one another, perplexed about whom he spoke.

तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता.

World English Bible: One of his disciples, whom Jesus loved, was at the table, leaning against Jesus’ chest.

म्हणून ज्याच्याविषयी तो बोलतो तो कोण आहे हे आम्हास सांग, असे शिमोन पेत्राने त्यास खुणावून म्हटले.

World English Bible: Simon Peter therefore beckoned to him, and said to him, “Tell us who it is of whom he speaks.”

तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता त्यास म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”

World English Bible: He, leaning back, as he was, on Jesus’ chest, asked him, “Lord, who is it?”

येशूने उत्तर दिले, “मी ज्याला हा घास ताटात बुचकळून देईन, तोच तो आहे.” आणि त्याने तो घास ताटात बुचकळून, तो शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याला दिला.

World English Bible: Jesus therefore answered, “It is he to whom I will give this piece of bread when I have dipped it.” So when he had dipped the piece of bread, he gave it to Judas, the son of Simon Iscariot.

आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”

World English Bible: After the piece of bread, then Satan entered into him. Then Jesus said to him, “What you do, do quickly.”

पण त्याने त्यास असे कशासाठी सांगितले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.

World English Bible: Now nobody at the table knew why he said this to him.

कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणांस गरज आहे ते विकत घ्यावे किंवा गरिबांस काहीतरी द्यावे असे येशू सांगतो आहे, असे कित्येकांस वाटले.

World English Bible: For some thought, because Judas had the money box, that Jesus said to him, “Buy what things we need for the feast,” or that he should give something to the poor.

मग घास घेतल्यावर तो लगेच बाहेर गेला; त्यावेळी रात्र होती.

World English Bible: Therefore having received that morsel, he went out immediately. It was night.

तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे;

World English Bible: When he had gone out, Jesus said, “Now the Son of Man has been glorified, and God has been glorified in him.

देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.

World English Bible: If God has been glorified in him, God will also glorify him in himself, and he will glorify him immediately.

मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा शोध कराल; आणि मी यहूदी अधिकाऱ्यांना सांगितले की, ‘मी जाईन तिकडे तुम्हास येता येणार नाही.’ तसे तुम्हासही आता सांगतो.

World English Bible: Little children, I will be with you a little while longer. You will seek me, and as I said to the Jews, ‘Where I am going, you can’t come,’ so now I tell you.

मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.

World English Bible: A new commandment I give to you, that you love one another. Just as I have loved you, you also love one another.

तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”

World English Bible: By this everyone will know that you are my disciples, if you have love for one another.”

शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी जाईन तिकडे, आता, तुला माझ्यामागे येता येणार नाही; पण नंतर तू येशील.”

World English Bible: Simon Peter said to him, “Lord, where are you going?” Jesus answered, “Where I am going, you can’t follow now, but you will follow afterwards.”

पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”

World English Bible: Peter said to him, “Lord, why can’t I follow you now? I will lay down my life for you.”

येशूने त्यास उत्तर दिले, “माझ्यासाठी तू आपला जीव देशील काय? मी तुला खरे खरे सांगतों, तू मला तीनदा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”

World English Bible: Jesus answered him, “Will you lay down your life for me? Most certainly I tell you, the rooster won’t crow until you have denied me three times.

Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.

प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .

Search by task, life event, format or tool name, in English, हिंदी or Hinglish.