बायबल · स्तोत्रसंहिता · अध्याय 23

स्तोत्रसंहिता 23

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे

या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा

हा अध्याय थोडक्यात

'दाविदाचे स्तोत्र' असे शीर्षक असलेले हे छोटे स्तोत्र देवाला मेंढपाळ म्हणून दाखवते, जो हिरवी कुरणे व शांत पाणी देतो आणि आपल्या मेंढरांना योग्य वाटेने नेतो. मृत्यूच्या छायेच्या दरीतूनही बोलणारा कोणत्याही अनिष्टाला भीत नाही, आणि मग देवाला उदार यजमान म्हणून पाहतो. हा बायबलमधील सर्वात आवडत्या उताऱ्यांपैकी एक आहे; यहूदी आणि ख्रिस्ती दोघेही तो अंत्यविधीच्या वेळी व संकटकाळात वाचतात.

दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.

World English Bible: A Psalm by David. The LORD is my shepherd; I shall lack nothing.

तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.

World English Bible: He makes me lie down in green pastures. He leads me beside still waters.

तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.

World English Bible: He restores my soul. He guides me in the paths of righteousness for his name’s sake.

मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.

World English Bible: Even though I walk through the valley of the shadow of death, I will fear no evil, for you are with me. Your rod and your staff, they comfort me.

तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.

World English Bible: You prepare a table before me in the presence of my enemies. You anoint my head with oil. My cup runs over.

खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.

World English Bible: Surely goodness and loving kindness shall follow me all the days of my life, and I will dwell in the LORD’s house forever.

Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.

प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .

Search by task, life event, format or tool name, in English, हिंदी or Hinglish.