या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा
हा अध्याय थोडक्यात
मंदिरात मुख्य याजक, शास्त्री व वडील येशूच्या अधिकाराविषयी प्रश्न करतात, आणि द्राक्षमळ्याच्या मालकाच्या मुलाला ठार मारणाऱ्या कुळांचा दाखला तो सांगतो, आणि बांधणाऱ्यांनी नाकारलेल्या दगडाविषयीचे स्तोत्रातील वचन उद्धृत करतो. कैसराला कर द्यावा की नाही या प्रश्नावर तो म्हणतो की जे कैसराचे ते कैसराला आणि जे देवाचे ते देवाला द्या. पुनरुत्थानाविषयी सदूकी लोकांना उत्तर देताना तो म्हणतो की देव 'मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे, कारण त्याच्यासाठी सर्व जिवंत आहेत', आणि मानसन्मान मिळवू पाहणे व विधवांचा गैरफायदा घेणे यांविषयी तो इशारा देतो.
एके दिवशी येशू परमेश्वराच्या भवनात लोकांस शिक्षण देत असता व सुवार्ता सांगत असता, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले.
World English Bible: On one of those days, as he was teaching the people in the temple and preaching the Good News, the priests and scribes came to him with the elders.
मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला.
World English Bible: He began to tell the people this parable: “A man planted a vineyard and rented it out to some farmers, and went into another country for a long time.
हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले.
World English Bible: At the proper season, he sent a servant to the farmers to collect his share of the fruit of the vineyard. But the farmers beat him and sent him away empty.
पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’
World English Bible: “But when the farmers saw him, they reasoned among themselves, saying, ‘This is the heir. Come, let’s kill him, that the inheritance may be ours.’
तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.” त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.”
World English Bible: He will come and destroy these farmers, and will give the vineyard to others.” When they heard that, they said, “May that never be!”
येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले, “तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला.
World English Bible: But he looked at them and said, “Then what is this that is written, ‘The stone which the builders rejected was made the chief cornerstone’?
नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक लोक यांनी त्याचवेळी त्यास अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यांना त्यास अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
World English Bible: The chief priests and the scribes sought to lay hands on him that very hour, but they feared the people—for they knew he had spoken this parable against them.
तेव्हा त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि त्यास बोलण्यांत धरून राज्यपालाच्या आणि अधिकाराच्या अधीन करावे म्हणून आपण प्रामाणिक धार्मिक आहोत असे भासविणारे हेर पाठवले.
World English Bible: They watched him and sent out spies, who pretended to be righteous, that they might trap him in something he said, so as to deliver him up to the power and authority of the governor.
म्हणून त्या हेरांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हास माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता.
World English Bible: They asked him, “Teacher, we know that you say and teach what is right, and aren’t partial to anyone, but truly teach the way of God.
“गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत.
World English Bible: They asked him, “Teacher, Moses wrote to us that if a man’s brother dies having a wife, and he is childless, his brother should take the wife and raise up children for his brother.
परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत
World English Bible: But those who are considered worthy to attain to that age and the resurrection from the dead neither marry nor are given in marriage.
जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वरास ‘अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव’ असे म्हणले व मरण पावलेलेसुद्धा उठवले जातात हे दाखवून दिले.
World English Bible: But that the dead are raised, even Moses showed at the bush, when he called the Lord ‘The God of Abraham, the God of Isaac, and the God of Jacob.’
“नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते.
World English Bible: “Beware of those scribes who like to walk in long robes, and love greetings in the marketplaces, the best seats in the synagogues, and the best places at feasts;
Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.
प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .