या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा
हा अध्याय थोडक्यात
मुख्य याजक येशूला रोमी अधिकारी पिलात याच्याकडे नेतात, तो बरब्बाला सोडतो आणि लोकांना खूश करण्यासाठी येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी स्वाधीन करतो; वधस्तंभावरील मृत्यू ही रोमी शिक्षा होती. शिपाई त्याची थट्टा करतात, कुरेनेकर शिमोनाला त्याचा वधस्तंभ वाहायला लावतात, आणि गुलगुथा येथे येशू मोठ्याने म्हणतो, 'एलोई, एलोई, लमा सबखथनी?', म्हणजे 'माझ्या देवा, माझ्या देवा, तू मला का सोडले आहेस?' तो मरण पावतो तेव्हा मंदिराचा पडदा फाटतो, एक शताधिपती म्हणतो, 'खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता!', त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रिया दुरून पाहतात, आणि अरिमथाईचा योसेफ त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवतो.
पहाट होताच मुख्य याजक लोक, वडीलजन, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी मसलत करून येशूला बांधून पिलाताच्या ताब्यात दिले.
World English Bible: Immediately in the morning the chief priests, with the elders, scribes, and the whole council, held a consultation, bound Jesus, carried him away, and delivered him up to Pilate.
पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
World English Bible: Pilate, wishing to please the multitude, released Barabbas to them, and handed over Jesus, when he had flogged him, to be crucified.
त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले.
World English Bible: When they had mocked him, they took the purple cloak off him, and put his own garments on him. They led him out to crucify him.
वाटेत त्यांना कुरेनेकर शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो आलेक्सांद्र व रूफ यांचा पिता होता व आपल्या रानातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्यास जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.
World English Bible: They compelled one passing by, coming from the country, Simon of Cyrene, the father of Alexander and Rufus, to go with them that he might bear his cross.
तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकास म्हणाले, त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्यास स्वतःचा बचाव करता येत नाही!
World English Bible: Likewise, also the chief priests mocking among themselves with the scribes said, “He saved others. He can’t save himself.
या इस्राएलाचा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.
World English Bible: Let the Christ, the King of Israel, now come down from the cross, that we may see and believe him.” Those who were crucified with him also insulted him.
मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
World English Bible: At the ninth hour Jesus cried with a loud voice, saying, “Eloi, Eloi, lama sabachthani?” which is, being interpreted, “My God, my God, why have you forsaken me?”
एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू.
World English Bible: One ran, and filling a sponge full of vinegar, put it on a reed and gave it to him to drink, saying, “Let him be. Let’s see whether Elijah comes to take him down.”
येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.
World English Bible: When the centurion, who stood by opposite him, saw that he cried out like this and breathed his last, he said, “Truly this man was the Son of God!”
तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया व सलोमी या होत्या.
World English Bible: There were also women watching from afar, among whom were both Mary Magdalene and Mary the mother of James the less and of Joses, and Salome;
येशू जेव्हा गालील प्रांतात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्यामागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरूशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या.
World English Bible: who, when he was in Galilee, followed him and served him; and many other women who came up with him to Jerusalem.
योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.
World English Bible: Joseph of Arimathaea, a prominent council member who also himself was looking for God’s Kingdom, came. He boldly went in to Pilate, and asked for Jesus’ body.
मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्यास तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर दगड बसविला.
World English Bible: He bought a linen cloth, and taking him down, wound him in the linen cloth and laid him in a tomb which had been cut out of a rock. He rolled a stone against the door of the tomb.
Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.
प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .