बायबल · मत्तय · अध्याय 1

मत्तय 1

येशूची वंशावळ आणि जन्म

या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा

मत्तयकृत शुभवर्तमान हे नव्या करारातील पहिले पुस्तक आहे, जे येशूच्या वंशावळीपासून व जन्मापासून त्याच्या मरणापर्यंत व पुनरुत्थानापर्यंतची कथा सांगते. सुरुवातीच्या मंडळीची परंपरा हे मत्तयाचे लेखन मानते, जो जकातदार होता आणि बारा प्रेषितांपैकी एक झाला; मजकुरात लेखकाचे नाव नाही, आणि अनेक अभ्यासकांच्या मते हे पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात मार्कच्या शुभवर्तमानाचा व इतर स्रोतांचा आधार घेऊन लिहिले गेले. येशू हिब्रू शास्त्रलेख पूर्ण करतो हे मत्तय अनेकदा दाखवतो, आणि त्याची शिकवण पाच मोठ्या भागांत मांडतो, ज्यांत डोंगरावरील प्रवचनही आहे. स्वर्गाचे राज्य, नीतिमत्त्व, आणि मसीहा व शिक्षक म्हणून येशू हे त्याचे मुख्य विषय आहेत.

हा अध्याय थोडक्यात

मत्तय येशूच्या वंशावळीने सुरुवात करतो, जी अब्राहामापासून दावीद राजामार्गे मरीयेचा पती योसेफ याच्यापर्यंत जाते. योसेफ व मरीया एकत्र राहण्यापूर्वीच मरीया पवित्र आत्म्यापासून गरोदर असल्याचे दिसते, आणि एक देवदूत स्वप्नात योसेफाला सांगतो की त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारावे आणि बाळाचे नाव येशू ठेवावे. मत्तय हा जन्म यशयाच्या इम्मानुएल, म्हणजे 'देव आपल्याबरोबर', या वचनाशी जोडतो, आणि ख्रिस्ती लोक येशूच्या कुमारीपासून झालेल्या जन्मावर विश्वास ठेवतात.

अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळ.

World English Bible: The book of the genealogy of Jesus Christ, the son of David, the son of Abraham.

अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले.

World English Bible: Abraham became the father of Isaac. Isaac became the father of Jacob. Jacob became the father of Judah and his brothers.

यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला.

World English Bible: Judah became the father of Perez and Zerah by Tamar. Perez became the father of Hezron. Hezron became the father of Ram.

अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन,

World English Bible: Ram became the father of Amminadab. Amminadab became the father of Nahshon. Nahshon became the father of Salmon.

सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला.

World English Bible: Salmon became the father of Boaz by Rahab. Boaz became the father of Obed by Ruth. Obed became the father of Jesse.

आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला.

World English Bible: Jesse became the father of King David. David the king became the father of Solomon by her who had been Uriah’s wife.

शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला.

World English Bible: Solomon became the father of Rehoboam. Rehoboam became the father of Abijah. Abijah became the father of Asa.

आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया,

World English Bible: Asa became the father of Jehoshaphat. Jehoshaphat became the father of Joram. Joram became the father of Uzziah.

उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया,

World English Bible: Uzziah became the father of Jotham. Jotham became the father of Ahaz. Ahaz became the father of Hezekiah.

हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया,

World English Bible: Hezekiah became the father of Manasseh. Manasseh became the father of Amon. Amon became the father of Josiah.

आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले.

World English Bible: Josiah became the father of Jechoniah and his brothers at the time of the exile to Babylon.

बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाला.

World English Bible: After the exile to Babylon, Jechoniah became the father of Shealtiel. Shealtiel became the father of Zerubbabel.

जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला.

World English Bible: Zerubbabel became the father of Abiud. Abiud became the father of Eliakim. Eliakim became the father of Azor.

अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला.

World English Bible: Azor became the father of Zadok. Zadok became the father of Achim. Achim became the father of Eliud.

एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब,

World English Bible: Eliud became the father of Eleazar. Eleazar became the father of Matthan. Matthan became the father of Jacob.

याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला.

World English Bible: Jacob became the father of Joseph, the husband of Mary, from whom was born Jesus, who is called Christ.

अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.

World English Bible: So all the generations from Abraham to David are fourteen generations; from David to the exile to Babylon fourteen generations; and from the carrying away to Babylon to the Christ, fourteen generations.

येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली.

World English Bible: Now the birth of Jesus Christ was like this: After his mother, Mary, was engaged to Joseph, before they came together, she was found pregnant by the Holy Spirit.

मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता, परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला.

World English Bible: Joseph, her husband, being a righteous man, and not willing to make her a public example, intended to put her away secretly.

तो या गोष्टींविषयी विचार करीत असता त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले; “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.

World English Bible: But when he thought about these things, behold, an angel of the Lord appeared to him in a dream, saying, “Joseph, son of David, don’t be afraid to take to yourself Mary as your wife, for that which is conceived in her is of the Holy Spirit.

ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”

World English Bible: She shall give birth to a son. You shall name him Jesus, for it is he who shall save his people from their sins.”

प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे,

World English Bible: Now all this has happened that it might be fulfilled which was spoken by the Lord through the prophet, saying,

“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”

World English Bible: “Behold, the virgin shall be with child, and shall give birth to a son. They shall call his name Immanuel,” which is, being interpreted, “God with us.”

तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला.

World English Bible: Joseph arose from his sleep, and did as the angel of the Lord commanded him, and took his wife to himself;

तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही; आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.

World English Bible: and didn’t know her sexually until she had given birth to her firstborn son. He named him Jesus.

Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.

प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .

Search by task, life event, format or tool name, in English, हिंदी or Hinglish.