बायबल · मत्तय · अध्याय 28

मत्तय 28

पुनरुत्थान आणि आज्ञा

या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा

हा अध्याय थोडक्यात

आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे मग्दालीया मरीया आणि दुसरी मरीया कबरेकडे जातात, आणि एक देवदूत त्यांना सांगतो, 'तो येथे नाही, कारण तो उठला आहे.' वाटेत येशू त्यांना भेटतो, तर शिष्यांनी शरीर चोरून नेले असे सांगण्यासाठी पहारेकऱ्यांना पैसे दिले जातात. गालीलमधील एका डोंगरावर तो अकरा शिष्यांना सांगतो की सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि वचन देतो, 'मी सदासर्वदा तुमच्याबरोबर आहे'; ख्रिस्ती लोक याला महान आज्ञा म्हणतात.

मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या

World English Bible: Now after the Sabbath, as it began to dawn on the first day of the week, Mary Magdalene and the other Mary came to see the tomb.

त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.

World English Bible: Behold, there was a great earthquake, for an angel of the Lord descended from the sky and came and rolled away the stone from the door and sat on it.

त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.

World English Bible: His appearance was like lightning, and his clothing white as snow.

पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले.

World English Bible: For fear of him, the guards shook, and became like dead men.

देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात.

World English Bible: The angel answered the women, “Don’t be afraid, for I know that you seek Jesus, who has been crucified.

पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.

World English Bible: He is not here, for he has risen, just like he said. Come, see the place where the Lord was lying.

आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”

World English Bible: Go quickly and tell his disciples, ‘He has risen from the dead, and behold, he goes before you into Galilee; there you will see him.’ Behold, I have told you.”

तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.

World English Bible: They departed quickly from the tomb with fear and great joy, and ran to bring his disciples word.

मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.

World English Bible: As they went to tell his disciples, behold, Jesus met them, saying, “Rejoice!” They came and took hold of his feet, and worshiped him.

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.”

World English Bible: Then Jesus said to them, “Don’t be afraid. Go tell my brothers that they should go into Galilee, and there they will see me.”

त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.

World English Bible: Now while they were going, behold, some of the guards came into the city and told the chief priests all the things that had happened.

नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.

World English Bible: When they were assembled with the elders and had taken counsel, they gave a large amount of silver to the soldiers,

ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.

World English Bible: saying, “Say that his disciples came by night and stole him away while we slept.

हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.”

World English Bible: If this comes to the governor’s ears, we will persuade him and make you free of worry.”

मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते.

World English Bible: So they took the money and did as they were told. This saying was spread abroad among the Jews, and continues until today.

पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.

World English Bible: But the eleven disciples went into Galilee, to the mountain where Jesus had sent them.

आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.

World English Bible: When they saw him, they bowed down to him; but some doubted.

तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.

World English Bible: Jesus came to them and spoke to them, saying, “All authority has been given to me in heaven and on earth.

म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.

World English Bible: Go and make disciples of all nations, baptizing them in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit,

आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”

World English Bible: teaching them to observe all things that I commanded you. Behold, I am with you always, even to the end of the age.” Amen.

मत्तय वर प्रश्नमंजूषा

  1. मत्ती के अनुसार यीशु का जन्म किस नगर में हुआ?

  2. ज्योतिषियों ने बालक को कौन सी भेंटें दीं?

  3. पाँच हज़ार को खिलाने से पहले चेलों के पास कितनी रोटियाँ थीं?

  4. किसने कहा, 'तू जीवित परमेश्वर का पुत्र मसीह है'?

  5. मत्ती 28:19 में चेलों को किसके नाम से बपतिस्मा देने को कहा गया है?

तुमचा स्कोर: 0 / 5

Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.

प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .

Search by task, life event, format or tool name, in English, हिंदी or Hinglish.