या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा
हा अध्याय थोडक्यात
मंडपांच्या सणासाठी येशू गुप्तपणे यरूशलेमेस जातो आणि मंदिरात शिकवतो, तर तो ख्रिस्त आहे की नाही यावर लोक वाद घालतात आणि काही पुढारी त्याला धरू पाहतात. सणाच्या शेवटच्या मोठ्या दिवशी तो मोठ्याने म्हणतो, 'कोणी तहानेला असेल तर त्याने माझ्याकडे येऊन प्यावे', आणि योहान हे दिल्या जाणाऱ्या आत्म्याशी जोडतो. त्याला धरण्यासाठी पाठवलेले शिपाई परत येऊन म्हणतात, 'कोणीही मनुष्य कधी असे बोलला नाही', आणि निकदेम सांगतो की नियमशास्त्राप्रमाणे आधी योग्य सुनावणी झाली पाहिजे.
म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत.
World English Bible: His brothers therefore said to him, “Depart from here and go into Judea, that your disciples also may see your works which you do.
आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.”
World English Bible: There was much murmuring among the multitudes concerning him. Some said, “He is a good man.” Others said, “Not so, but he leads the multitude astray.”
जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.
World English Bible: He who speaks from himself seeks his own glory, but he who seeks the glory of him who sent him is true, and no unrighteousness is in him.
मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?
World English Bible: If a boy receives circumcision on the Sabbath, that the law of Moses may not be broken, are you angry with me because I made a man completely healthy on the Sabbath?
यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही.
World English Bible: Jesus therefore cried out in the temple, teaching and saying, “You both know me, and know where I am from. I have not come of myself, but he who sent me is true, whom you don’t know.
तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”
World English Bible: But of the multitude, many believed in him. They said, “When the Christ comes, he won’t do more signs than those which this man has done, will he?”
लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले.
World English Bible: The Pharisees heard the multitude murmuring these things concerning him, and the chief priests and the Pharisees sent officers to arrest him.
यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय?
World English Bible: The Jews therefore said among themselves, “Where will this man go that we won’t find him? Will he go to the Dispersion among the Greeks and teach the Greeks?
ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
World English Bible: But he said this about the Spirit, which those believing in him were to receive. For the Holy Spirit was not yet given, because Jesus wasn’t yet glorified.
Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.
प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .