माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
World English Bible: My son, don’t forget my teaching, but let your heart keep my commandments,
बायबल · नीतिसूत्रे · अध्याय 3
विश्वास आणि ज्ञान
या परंपरेतील विद्वानांचे परीक्षण बाकी आहे. मूळ ग्रंथ सार्वजनिक (पब्लिक डोमेन) आहेत; सोपे अर्थ आणि टिपा IndiaDigital ने लिहिल्या आहेत आणि त्यांची तपासणी सुरू आहे. आम्ही प्रत्येक परंपरेची शिकवण तिच्याच शब्दांत सांगतो आणि कोणत्याही धर्माला उच्च-नीच ठरवत नाही. दुरुस्ती कळवा
नीतिसूत्रे हे चांगले जीवन कसे जगावे याविषयीच्या ज्ञानवचनांचा व शिकवणींचा संग्रह आहे, जो हिब्रू बायबलमधील ज्ञानसाहित्याचा भाग आहे. परंपरा हे शलमोन राजाशी जोडते, आणि काही भागांत त्याचे नाव आहे, पण पुस्तकात इतर ज्ञानी लोकांचीही नावे आहेत, आणि अभ्यासक हे दीर्घ काळात संकलित झाले असे मानतात. 'परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा आरंभ आहे' असे ते शिकवते, आणि प्रामाणिकपणा, परिश्रम, बोलणे, कुटुंब, धन आणि गरिबांवरील दया यांविषयी व्यावहारिक मार्गदर्शन देते.
एक पिता आपल्या मुलाला विनंती करतो की त्याने आपली शिकवण धरून ठेवावी, दया व सत्य सोडू नये, आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून न राहता पूर्ण अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेवावा. आपल्या संपत्तीने देवाचा सन्मान करावा, परमेश्वराची शिस्त प्रेमाचे लक्षण म्हणून स्वीकारावी, आणि ज्ञानाला चांदी, सोने व रत्नांपेक्षा मौल्यवान मानावे, असे हा अध्याय सांगतो. शेजाऱ्यांशी उदार आणि न्यायाने वागण्याच्या व्यावहारिक सल्ल्याने तो संपतो.
माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;
World English Bible: My son, don’t forget my teaching, but let your heart keep my commandments,
कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.
World English Bible: for they will add to you length of days, years of life, and peace.
विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.
World English Bible: Don’t let kindness and truth forsake you. Bind them around your neck. Write them on the tablet of your heart.
म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.
World English Bible: So you will find favor, and good understanding in the sight of God and man.
तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;
World English Bible: Trust in the LORD with all your heart, and don’t lean on your own understanding.
तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.
World English Bible: In all your ways acknowledge him, and he will make your paths straight.
तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
World English Bible: Don’t be wise in your own eyes. Fear the LORD, and depart from evil.
हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.
World English Bible: It will be health to your body, and nourishment to your bones.
तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,
World English Bible: Honor the LORD with your substance, with the first fruits of all your increase;
त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.
World English Bible: so your barns will be filled with plenty, and your vats will overflow with new wine.
माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,
World English Bible: My son, don’t despise the LORD’s discipline, neither be weary of his correction;
जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.
World English Bible: for whom the LORD loves, he corrects, even as a father reproves the son in whom he delights.
ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.
World English Bible: Happy is the man who finds wisdom, the man who gets understanding.
ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
World English Bible: For her good profit is better than getting silver, and her return is better than fine gold.
ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.
World English Bible: She is more precious than rubies. None of the things you can desire are to be compared to her.
तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.
World English Bible: Length of days is in her right hand. In her left hand are riches and honor.
तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.
World English Bible: Her ways are ways of pleasantness. All her paths are peace.
जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.
World English Bible: She is a tree of life to those who lay hold of her. Happy is everyone who retains her.
परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले.
World English Bible: By wisdom the LORD founded the earth. By understanding, he established the heavens.
त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.
World English Bible: By his knowledge, the depths were broken up, and the skies drop down the dew.
माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.
World English Bible: My son, let them not depart from your eyes. Keep sound wisdom and discretion,
ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.
World English Bible: so they will be life to your soul, and grace for your neck.
नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;
World English Bible: Then you shall walk in your way securely. Your foot won’t stumble.
तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.
World English Bible: When you lie down, you will not be afraid. Yes, you will lie down, and your sleep will be sweet.
जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;
World English Bible: Don’t be afraid of sudden fear, neither of the desolation of the wicked, when it comes;
कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील.
World English Bible: for the LORD will be your confidence, and will keep your foot from being taken.
ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.
World English Bible: Don’t withhold good from those to whom it is due, when it is in the power of your hand to do it.
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”
World English Bible: Don’t say to your neighbor, “Go, and come again; tomorrow I will give it to you,” when you have it by you.
तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.
World English Bible: Don’t devise evil against your neighbor, since he dwells securely by you.
काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.
World English Bible: Don’t strive with a man without cause, if he has done you no harm.
तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.
World English Bible: Don’t envy the man of violence. Choose none of his ways.
कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.
World English Bible: For the perverse is an abomination to the LORD, but his friendship is with the upright.
परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो.
World English Bible: The LORD’s curse is in the house of the wicked, but he blesses the habitation of the righteous.
तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो.
World English Bible: Surely he mocks the mockers, but he gives grace to the humble.
ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.
World English Bible: The wise will inherit glory, but shame will be the promotion of fools.
नीतिवचन 3:5 कहता है कि पूरे मन से यहोवा पर भरोसा रखो और किसका सहारा न लो?
नीतिवचन 3:12 में यहोवा अपने प्रिय जनों को किसके समान डाँटता है?
नीतिवचन 3:15 के अनुसार बुद्धि किससे अधिक मूल्यवान है?
तुमचा स्कोर: 0 / 3
Indian Revised Version (IRV) Marathi 2019, Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0, eBible.org; cross-references in brackets removed. English: World English Bible (public domain), eBible.org. eBible.org (CC BY-SA 4.0: this page may be shared under the same licence). अध्याय सारांश: IndiaDigital, परीक्षण बाकी.
प्रत्येक परंपरेतील लोकांच्या दुरुस्त्यांचे स्वागत आहे: support@indiadigital.org. शेवटची तपासणी: .